मानवत तालुका प्रतिनिधी / इलियास पठाण
मानवत : मोहम्मद पैगंबर (SAW) जयंतीनिमित्त जमाते इस्लामी हिंद यांच्या वतीने मानवत शहरातील मरकस मशीद, पेठ मोहल्ला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिबिराच्या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी जमाते इस्लामी हिंदच्या पदाधिकाऱ्यांनी मानवतचे पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, अनिस कौसडीकर, तसेच नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी कोमल सावरे व नगर अभियंता सय्यद अन्वर यांची भेट घेऊन शिबिराची माहिती दिली.
मानवी जीवन वाचविण्यासाठी रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेता, पैगंबर जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात युवकांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जमाते इस्लामी हिंदच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.















Leave a Reply