परभणीत अल्पसंख्याक समाजासाठी ‘कार्यकर्ता नेतृत्व विकास व मार्गदर्शन शिबिर’
परभणी : अल्पसंख्याक समाजाच्या सक्षमीकरणासाठी महा मायनॉरिटी एनजीओ फोरम, महाराष्ट्र (MMNF) यांच्या वतीने ‘कार्यकर्ता नेतृत्व विकास व मार्गदर्शन शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर शनिवार, 12 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत परभणी शहरातील ब्राइट स्टार इंग्लिश स्कूल, डॉ. इक्बाल नगर, प्रशासकीय इमारतीच्या मागे हा कार्यक्रम पार पडला.
शिबिरामध्ये अल्पसंख्याक समाजाचे घटनात्मक व कायदेशीर हक्क, सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका, शिक्षण-रोजगार व कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती, NGO व सामाजिक संस्थांचे प्रभावी व्यवस्थापन तसेच समाजासाठी सक्षम कार्यकर्ता कसा घडवावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी MMNF चे संस्थापक अध्यक्ष जाकीर सिकलगार, कार्यकारी अध्यक्ष डॉ. असलम बारी आणि उपाध्यक्ष मारूफ सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला, NGO प्रतिनिधी आणि समाजहित चिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“जागरूक कार्यकर्ता – संघटित समाज – सक्षम अल्पसंख्याक” या संकल्पनेतून आयोजित या शिबिराच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाला अधिक सक्षम आणि संघटित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.



















Leave a Reply