परभणीत मराठवाडा विभागीय परिषद उत्साहात संपन्न
परभणी : महाराष्ट्र मायनॉरिटी NGO फोरम (MMNF), परभणी यांच्या वतीने आयोजित मराठवाडा विभागीय परिषद आज, रविवार, १३ सप्टेंबर रोजी परभणीत उत्साहात पार पडली.
हॉटेल मदनी पॅलेस येथे सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या या परिषदेला माजी राज्यमंत्री डॉ. फौजिया खान तसेच छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त जनाब अब्दुल मतीन देशमुख यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
परिषदेस संस्थापक अध्यक्ष जनाब जाकीर शिकलगार(सातारा), अध्यक्ष श्री. अमीन सोलकर, MMNF चे कार्याध्यक्ष डॉ. असलम बारी, उपाध्यक्ष जनाब मारुफ शेख कोषाध्यक्ष सय्यद लईख नाक्षबंदी सह मान्यवर मार्गदर्शक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन MMNF चे जिल्हाध्यक्ष जनाब शेख उस्मान आणि सचिव जनाब मोहसिन शेख यांनी केले. या परिषदेत सामाजिक कार्य, अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा तसेच संघटनात्मक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
परिषदेच्या माध्यमातून मराठवाड्यातील सामाजिक संस्थांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने विचारविनिमय करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.























Leave a Reply